Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Shirur: उष्णतेची लाट तीव्र; उष्माघाताने महिलेचा मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

by
April 28, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Shirur: उष्णतेची लाट तीव्र; उष्माघाताने महिलेचा मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Shirur: राज्यात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४३ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून उष्णतेची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाढत्या उष्माघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

उष्णतेमुळे नागरिकांमध्ये उलट्या, जुलाब, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या तक्रारीही वाढताना दिसत असल्याने लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेणे आवश्यक असल्याचे पिंपरखेड येथील श्रीराम क्लिनिकचे संचालक डॉ. राम पोखरकर यांनी सांगितले.

उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळावे. आहारात हलके पदार्थ, लिंबूपाणी, ताक, तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. दिवसातून किमान पाच ते सहा लिटर पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar