Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Sesame Seeds Benefits: तिळामध्ये आहे कॅल्शियमचा खजिना; हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी हिवाळ्यात असा करा तिळाचा वापर

by
January 5, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Sesame Seeds Benefits: वाढतं वय, चुकीची जीवनशैली आणि अनियमित आहार यामुळे आजकाल सांधेदुखी आणि हाडं कमजोर होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अशा वेळी तिळाचा आहारात समावेश केल्यास हाडांसाठी मोठा फायदा होऊ शकतो. तिळं ही हाडांसाठी विश्वासार्ह आणि नैसर्गिक ताकद देणारी गोष्ट मानली जाते.

हिवाळा सुरू होताच तिळाचा वापर वाढतो आणि त्यामागे शास्त्रीय कारणही आहे. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी महत्त्वाची खनिजं भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियम हाडं मजबूत करतं, तर मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांची रचना सुधारण्यास मदत करतात.

सांधेदुखीपासून आराम

वाढत्या वयासोबत, विशेषतः महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. तिळाचं नियमित सेवन केल्यास या समस्येपासून बचाव होऊ शकतो. तिळामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असल्यामुळे सांध्यांची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. संधिवात, सांधेदुखी किंवा सांध्यांच्या जकडणीत तिळं उपयुक्त ठरू शकतात.

आहारात तिळाचा समावेश कसा कराल?

तिळं रोजच्या आहारात समाविष्ट करणं खूप सोपं आहे. तज्ज्ञांच्या मते दररोज १ ते २ चमचे तिळं खाणं पुरेसं आहे.

हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणं सर्वात लोकप्रिय आहे. गूळ-तिळाचे लाडू चविष्ट तर असतातच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. तिळं थोड भाजून स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. सॅलड, सूप किंवा भाज्यांवर तिळं भुरभुरू शकता. तिळाची चटणीही आहारात समाविष्ट करता येते, जी पोषणमूल्य वाढवते.

प्रमाणातच खा

काळी किंवा पांढरी दोन्ही प्रकारची तिळं आरोग्यासाठी चांगली आहेत. मात्र तिळांमध्ये कॅलरी जास्त असल्याने त्यांचं अति सेवन टाळावं. जास्त तिळं खाल्ल्यास शरीराला त्रास होऊ शकतो.

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य प्रमाणात तिळाचा समावेश केल्यास हाडं मजबूत राहतात आणि शरीर दीर्घकाळ सक्रिय व तंदुरुस्त राहते.

Join our WhatsApp Channel

The post Sesame Seeds Benefits: तिळामध्ये आहे कॅल्शियमचा खजिना; हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी हिवाळ्यात असा करा तिळाचा वापर appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar