तीळ हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा खाद्यघटक आहे. तिळाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकरसंक्रातीसारखा सण तर केवळ तीळ आणि तीळाच्या पदार्थांनी साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी बहुतेक तिळाचे पदार्थ बनविले जातात. तिळाच्या पदार्थांप्रमाणेच तीळाचे तेलही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
हे तेल मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. भारतामध्ये तब्बल सात कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. ही संख्या वरचेवर वाढतच आहे. जर आहारात तिळाच्या तेलाचा अधिकाधिक वापर केला तर मधुमेहावर नियंत्रण मिळविता येऊ शकते.
जगभरात दरवर्षी लाखो टन तेलाचे उत्पादन केले जाते, त्यापैकी भारतात बहुतांश उत्पादन होते. त्यामुळे तिळाच्या तेलाचा वापर मधुमेहग्रस्तांनी नियमित केला पाहिजे, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. तिळाच्या तेलामध्ये ई जीवनसत्त्व आणि लिगनॅन्स ही ऍण्टीऑक्सिडेंट विपुल प्रमाणात असते. टाइप-टू मधुमेह रुग्णांसाठी हे घटक उपयुक्त असतात. तीळाच्या तेलाचे नियमित सेवन केल्यास अनेक विकाराचे निर्मूलन होण्यास मदत होते.