तुम्ही अनेकवेळा मुलांना शाळेत जाताना पाहिलं असेल आणि तुम्हीही स्कूल बसमधून गेला असाल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्कूल बसचा रंग पिवळा का असतो? पांढरा निळा, लाल आणि हिरवा का नाही? हा नियम सुप्रीम कोर्टाने लागू केला आहे, आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की सरकारने बसचा रंग पिवळा का निवडला? यामागे खूप मोठे वैज्ञानिक कारण आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात स्कूल बसचा रंग पिवळा असतो. पण या पिवळ्या रंगामागे मुलांची सुरक्षितता आहे.
बसचा रंग लाल का नाही?
वैज्ञानिकदृष्ट्या, लाल रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते. लाल रंग दुरूनही दिसतो. लाल रंग हे धोक्याचेसुद्धा लक्षण आहे. आता तुम्ही विचार करत असाल की स्कूल बस लाल झाली असती. पण त्यामागे एक मोठे तथ्य आहे, लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते. पण त्यातुलनेत पिवळा रंग जास्त आकर्षित करतो. आणि पिवळा रंग आपण सहज पाहू शकतो. अंधारातही आपण हा रंग सहज पाहू शकतो. शाळेच्या बसेससाठी हा रंग सुरक्षित असण्याची इतरही अनेक कारणे आहेत, धुक्यातही तो दिसतो कारण सर्व शाळा सकाळी उघडतात आणि हिवाळ्यात सकाळी धुके असते. म्हणूनच वैज्ञानिकदृष्ट्या बस पिवळ्या रंगाची असते.
स्कूल बस कधी सुरू झाली?
स्कूल बस पहिल्यांदा लंडनमध्ये सुरु झाली. ही गोष्ट 1827 ची आहे. जेव्हा या बसमध्ये एकूण 25 मुले येऊ शकत होती, पण तेव्हा स्कूल बसचा विशिष्ट असा एकही रंग नव्हता. प्रत्येक रंगाची बस स्कुल बस म्हणून वापरली जात होती. पण नंतर अमेरिकेने बससाठी पिवळा रंग आणला.
Business Idea : उन्हाळ्यात कमी खर्चात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल भरघोस कमाई
विद्यार्थ्यांसाठी बस अधिक सुरक्षित
दुसरे म्हणजे कारपेक्षा बसमध्ये प्रवास करणे अधिक सुरक्षित मानले जाते. कारण बसची सीट अपघाताच्या वेळी एवढी उंच असते की, एखाद्या एअर बॅगप्रमाणे ती सीटवर बसलेल्या विद्यार्थ्याला इजा होऊ देत नाही. जरी कार आणि बसची टक्कर झाली तरी बसच्या खालच्या भागाला दुखापत होणार नाही. काही प्रमाणात नुकसान होईल मात्र आत बसलेले लोक सुरक्षित राहतील आणि सर्व लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला तर देशातील प्रदूषण आणि अपघात किती कमी होतील, हा यामागील उद्देश होता.
The post School Bus : जगभरातील स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या….महत्त्वपूर्ण कारण appeared first on Dainik Prabhat.