Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Schizophrenia: वेळीच ओळखा स्किझोफ्रेनिया; योग्य उपचारांनी मानसिक आजारावर मात शक्य

by
March 13, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Schizophrenia: स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असला तरी तो प्रत्यक्षात मेंदूशी संबंधित विकार आहे. या आजारामुळे व्यक्तीच्या विचार, भावना आणि वागणुकीवर परिणाम होतो. त्यामुळे रुग्ण हळूहळू वास्तव जगापासून दूर जाऊ लागतो आणि स्वतःच्या कल्पनांच्या किंवा भ्रामक जगात जगू लागतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे.

स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्ती अनेकदा एकलकोंड्या होतात. त्यांना इतरांवर सहज विश्वास ठेवता येत नाही. कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत आहे, आपल्याला त्रास देईल किंवा आपले नुकसान करेल अशी भीती त्यांच्या मनात कायम असते. त्यामुळे ते कधी कधी आक्रमक किंवा हिंसकही होऊ शकतात. मात्र हा आजार वेळीच लक्षात आला तर योग्य उपचारांनी रुग्णाला सामान्य आयुष्य जगणे शक्य होते.

या आजाराचे मुख्य कारण मेंदूमधील काही रसायनांमध्ये होणारे बदल आहे. विशेषतः डोपामिन आणि सेरोटोनिन या रसायनांचे प्रमाण बिघडल्याने स्किझोफ्रेनियाची लक्षणे दिसू लागतात. व्यक्तीचे विचार, भावना आणि वागणूक यामध्ये समतोल राहात नाही. त्यामुळे त्यांची बोलण्याची पद्धत, विचार करण्याची शैली आणि वर्तन इतरांपेक्षा वेगळी दिसते.

स्किझोफ्रेनियाची काही लक्षणे स्पष्टपणे दिसून येतात. उदाहरणार्थ स्वतःशीच बोलणे किंवा हसणे, अनावश्यक हातवारे करणे, सतत भटकत राहणे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, अस्वच्छ राहणे किंवा अचानक चिडचिड करणे. काही रुग्णांमध्ये संशयी स्वभाव, भावनिक बदल, परिस्थितीशी जुळवून न घेणे किंवा विचारांमध्ये सुसूत्रता नसणे अशा समस्या दिसतात.

भारतामध्ये सुमारे दोन ते तीन टक्के लोकांना स्किझोफ्रेनियाचा त्रास असू शकतो, असे काही संशोधनांमध्ये आढळले आहे. मात्र हा आजार ओळखणे अनेकदा कठीण जाते. कारण सुरुवातीला त्याची लक्षणे इतर मानसिक समस्यांसारखी दिसतात. त्यामुळे अनेक रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचतात तेव्हा आजार बराच वाढलेला असतो.

स्किझोफ्रेनियाबरोबरच बाय-पोलार मूड डिसऑर्डर हा देखील एक मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्ती कधी अतिशय आनंदी आणि उत्साही असते, तर कधी ती अत्यंत उदास आणि निराश होते. या दोन टोकांच्या भावना आलटून-पालटून दिसतात. या अवस्थेला ‘मेनिया’ आणि ‘डिप्रेशन’ असे म्हटले जाते.

तज्ज्ञांच्या मते, मानसिक आजारांबाबत समाजात अजूनही अज्ञान आणि भीती आहे. जसे डेंग्यू, स्वाईन फ्लू किंवा इतर आजारांबाबत जागरूकता वाढली, तसेच मानसिक आरोग्याबाबतही जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा शेजाऱ्यांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्यांना वेळेत डॉक्टरांकडे नेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

स्किझोफ्रेनियावर उपचार करताना केवळ औषधे पुरेशी नसतात. डॉक्टर, रुग्ण आणि कुटुंबीय यांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असते. योग्य औषधे, समुपदेशन आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास रुग्ण या आजारावर मात करून पुन्हा सामान्य जीवन जगू शकतो.

 

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar