Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अशी वाचवा किडनी…

by प्रभात वृत्तसेवा
January 17, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अशी वाचवा किडनी…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

देशातील बहुसंख्य लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच हा किडनी विकारांचा धोका वाढला आहे. इतर अनेक रोगांप्रमाणे आणि त्यांच्या लक्षणांप्रमाणे किडनी विकार हा अचानक आपलं रूप दाखवत नाही.

लोकांनी आपल्या शरीराची काळजी न घेतल्यामुळेच हा विकार उद्भवतो. मार्च या जागतिक किडनी दिनानिमित्ताने किडनीच्या

विकारांना कसं दूर ठेवावं?
आरोग्य उत्तम राखणे ही एक कला आहे. उत्तम आरोग्य हे आपल्याला सहजासहजी मिळत नसतं, तर देवाने दिलेल्या आपल्याला या शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी प्रयत्नांची आवश्‍यकता असते. जीवनशैलीतील सततचे बदल हे सध्या डायबेटिस, हायपरटेन्शन, कोलेस्टेरॉल, थायरॉइड आदी आजारांना निमंत्रण ठरू लागले आहेत.
फास्ट फुडचा अतिरेक आणि बैठे काम करण्याची सवय, त्याचवेळी व्यायामाचा कंटाळा किंवा त्यासाठी वेगळा वेळ न देणे हे डायबेटिस, हायपरटेन्शन, जठरासंबंधीचे विकार आणि स्थूलपणा या आजारांना निमंत्रण ठरते आहे.
इतकंच नव्हे, तर हे आजार लहान मुले आणि तरुणांमध्ये वाढू लागले असून, या आजारांमुळे किडनी आणि त्यासंबंधीचे विकार बळावू लागले आहेत.

पुढील पथ्ये पाळतील तर तुम्ही तुमची किडनी तंदुरुस्त ठेवू शकता :
-तुमच्या रक्तातील ग्लुकोज आवाक्‍यात ठेवा.
-तुमचा रक्तदाब नियमित ठेवा. तुम्ही जर रक्तदाबासाठी काही औषधे घेत असाल, तर ती तुमच्या डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने घ्या.
सकस आहार घ्या आणि तुमच्या आहारतज्ज्ञाने ठरवून दिलेल्या आहाराप्रमाणे घ्या.
-वर्षातून किमान एकदा तरी किडनीसंदर्भातील चाचण्या करून घ्याव्यात.
-वारंवार पेनकिलर्स घेणे टाळावे. आर्थरायटीस रोगामध्ये नॉन स्टेरॉइड दाहकविरोधी औषधांचे दररोज सेवन केल्यामुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते.
-तुम्ही जर आर्थरायटीजसारख्या आजाराने ग्रस्त असाल आणि अशा प्रकारची औषधं तुम्हाला घ्यावी लागत असतील, तर यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्‍टरांशी चर्चा करा आणि किडनीला -कोणतीही हानी पोहोचणार नाही अशा तऱ्हेने तुमच्या आजारावर तोडगा काढा.
-मूत्राशय किंवा किडनी विकारांसाठी योग्य डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

वाईट सवयी सोडा
-मद्यपानाला रामराम करा.
-धूम्रपानामुळेही तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे किडनीचे विकार उद्भवू शकतात.
-चरबीयुक्त आहार घेणे टाळा. शरीराचे वजन कमी ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबही नियमित राहू शकेल.
-उच्च तणावाच्या जीवनशैलीत राहणे टाळा. त्यामुळे हायपरटेन्शनचा विकार जडू शकतो.
-या विकाराविषयी किमान जनजागृती आणि माहितीद्वारे किडनी विकार दूर ठेवता येतात आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकता.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar