[[{“value”:”
Saif Ali Khan Fitness । Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल असून उपचार घेत आहे. गुरुवारी रात्री वांद्रे येथील सैफच्या राहत्या घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर धारधार शस्त्राने सहा वार केल्याने सैफ गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर दोन शस्रक्रीया करण्यात आल्या आहेत.
सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करुन बाहेर काढला असून त्याच्या मानेवर आणि डाव्या हातावर झालेल्या जखमांवरील उपचाराचा भाग म्हणून प्लॅस्टीक सर्जरीही करण्यात आली आहे.
सध्या अभिनेत्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार असून काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सैफ अली खान ५४ वर्षांचा असून, देखील या वयातही तो खूप तंदुरुस्त दिसतो.
त्याच्या फिट रूटीनमुळे, सैफ अली खान त्याच्या वयापेक्षा जास्त तरुण दिसतो. कृपया लक्षात घ्या की सैफला २००७ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा तो ३६ वर्षांचा होता. तेव्हापासून त्याने त्याच्या आहारात आवश्यक बदल केले आहेत.
अभिनेता सैफ अला खान त्याच्या आहाराची जास्त काळजी घेतो. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की, ‘जर तो शूटिंगसाठी बाहेर गेला तर त्याला देसी (घरचे) जेवण खायला आवडते. सैफला स्वयंपाक करायलाही खूप आवडते.
तुम्हाला सुद्धा ५० व्या वर्षीही निरोगी आणि फिट राहायचे असेल तर तुम्ही सैफच्या डाएट प्लॅनचे अनुसरण करू शकता. याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एका मुलाखतीदरम्यान सैफ अली खानने त्याच्या डाएटबद्दल सांगितले. त्याने सांगितले होते की त्याला दुपारच्या जेवणात गाजर, वाटाणे आणि भेंडीसारखे पदार्थ खायला आवडतात. त्याला नाश्त्यात अंडी आणि टोस्ट खायला आवडते. सैफने सांगितले होते की त्याला मांस खायलाही आवडते. त्याला रात्री मासे आणि भात खायला आवडते.
फिटनेस फ्रिक नाही :
सैफ अली खानला फिटनेसची फारशी आवड नाही. तो कडक फिटनेस रूटीन पाळत नाही. सैफ म्हणतो की तो रविवारी थोडा उशिरा उठतो. त्यानंतर तो स्वयंपाक करतो आणि हलका व्यायाम देखील करतो.
‘या’ तीन गोष्टींपासून दूर राहतो :
हृदयविकाराच्या झटक्यानंतर सैफने त्याच्या दिनचर्येतही अनेक बदल केले. सैफ अली खान पूर्वी सिगारेट ओढायचा. पण आता तो धूम्रपानापासून मैल दूर राहतो.
सिगारेट ओढल्याने रक्ताभिसरण बिघडते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यासोबतच त्याने दारू पिणेही बंद केले आहे. दारू पिल्याने रक्तदाबावर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
The post Saif Ali Khan Fitness : वयाची पन्नाशी ओलांडूनही सैफ दिसतो एकदम फिट; पाहा अभिनेत्याचा जबरदस्त डायट प्लॅन appeared first on Dainik Prabhat.
“}]]