Running In Cold Weather : सध्या हिवाळा सुरु आहे, देशभरात थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे अनेक लोकांना व्यायाम करायचा कंटाळा येतो आहे. तर काही लोक हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असो रोज व्यायाम करतांना दिसतात. मात्र हिवाळ्यात व्यायाम करतांना काही गोष्टींची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. जर हिवाळ्यात काळजी घेत व्यायाम केला नाही तर यांचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात.
हात पायांना करा प्रोटेक्ट –
हिवाळयात रनिंग आणि एक्सरसाइज करतांना हातात ग्लव्स घालायला हवे, आणि पायात थर्मल शूज घालायला हवे. कानाला थंडा वारा लागू नये यासाठी कान टोपी घालायला हवी.
हाइड्रेटेड राहा-
हिवाळ्यात बाहेर जरी थंडी असली तरी शरीराला हाइड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे, थंडीत थंडा वाऱ्यामुळे शरीर डिहाईड्रेट होऊ शकते त्यामुळे व्यायाम करण्याच्या एका तास आधी पाणी पिणे तसेच एका तास नंतर पाणी पिणे गरजेचे आहे.
बॉडी मेसेज समजून घेणे गरजेचे आहे –
व्यायाम करतांना बॉडीवर कुठल्याही प्रकारचा प्रेशर पडायला नको याची काळजी घेणे आवश्यक आहे
पोस्ट-वर्कआउट रिकवरी –
व्यायाम केल्यानंतर बॉडी रिकवरीला वेळ देणे गरजेचे आहे, यासाठी बॉडी स्ट्रेच करणे गरजेचे आहे.
The post Running In Cold Weather : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा appeared first on Dainik Prabhat.