एका ताज्या पाहणीनुसार पुणे आणि मुंबईमध्ये टाईप-2 डायबेटीस अर्थात डायबेटीस मेलिटसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही पहाणी जून 2019 ते ऑक्टोबर 2020 दरम्यान करण्यात आली असून महाराष्ट्रातील प्री-डायबिटीज मेलिटस (पीडीएम) संदर्भात आहे. या निरीक्षणांमधून असे दिसून येते की, महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागांमध्ये पीडीएमचा प्रभाव आहे. खरे तर, ग्रामीण भागामधील प्रमाण शहरी भागांपेक्षा काहीसे उच्च आहे. एकूण पीडीएम प्रमाण 24 टक्के आहे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या केलेल्या लोकांमध्ये डायबिटीज मेलिटसचे (डीएम) प्रमाण 17 टक्के आहे.
महाराष्ट्रामध्ये शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्री-डायबिटीज मेलिटसचा प्रभाव आहे. ग्रामीण भागांमध्ये असे निदशर्नास आले आहे की, प्री-डायबिटीज मेलिटसचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये 1.5 पट उच्च आहे. मधुमेह हा सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येणारा आजार बनत आहे आणि म्हणनूच, जीवनशैलीमध्ये बदल, नियमित व्यायाम, आरोग्यदायी आहाराचे सेवन आणि धूम्रपान टाळणे आवश्यक आहे. सध्याच्या महामारीदरम्यान आपण लवकर तपासणी आणि नियमित कालांतराने प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे या आजाराचे प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होईल.
तपासण्यांच्या आधारावर करण्यात आलेल्या संशोधनाच्या ठळक निष्पत्ती:
तपासण्या करण्यात आलेली शहरे: पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अहमदनगर, रत्नागिरी व नाशिक
तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या : 9,294 (वयोगट 18 वर्षांवरील)
पुण्यामध्ये 1436 व्यक्तींची, तर मुंबईमध्ये 2941 व्यक्तींची तपासणी करण्यात आली
या तपासण्यांमध्ये 61 टक्के पुरूष आहेत आणि 39 टक्के महिला आहेत
महाराष्ट्राच्या अर्ध-शहरी भागांमधून 65 टक्के प्रमाण आढळून आले, तर उर्वरित 35 टक्के शहरी भागांमधून आढळून आले
तपासणी केलेल्या व्यक्तींचे सरासरी वय 45 वर्षे आहे
प्री-डायबिटीज मेलिटस (पीडीएम)चे प्रमाण:
प्री-डायबिटीज मेलिटसचे एकूण प्रमाण 24 टक्के आहे
पुणे व मुंबईमधील पीडीएमचे प्रमाण:
पुणे: पुरूष: 28 टक्के, महिला: 21 टक्के
मुंबई: पुरूष: 25 टक्के, महिला: 20 टक्के
– अमोल नायकवडी