“राइट टू प्रोटीन’ या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत सार्वजनिक आरोग्य मोहिमेने प्रथिनांमुळे आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांकडे भारतीयांचे लक्ष वळविण्यासाठी व प्रथिनांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारताच्या पहिल्या “प्रोटीन डे’ची घोषणा केली आहे. जगभरातील अनेक देश 27 फेब्रुवारी हा दिवस प्रोटीन डे म्हणून साजरा करतात आणि या वर्षापासून भारतही या मोहिमेमध्ये सहभागी झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रोटीन डे मुळे भारतीयांना वेगवेगळ्या वनस्तपतींपासून मिळणाऱ्या तसेच प्राणीजन्य प्रथिनांच्या विविध प्रकारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तसेच अधिक चांगले पोषक घटक आणि आरोग्य मिळविण्यासाठी रोजच्या आहारात प्रथिनांची किती महत्त्वाची भूमिका असते हे जाणून घेण्याची संधीही मिळते.
आरोग्य क्षेत्रामध्ये भारताने सातत्याने मोठी झेप घेत असली तरीही अधिक आरोग्यपूर्ण व स्वस्थ आयुष्य जगण्याच्या दृष्टीने आपल्या सवयींमध्ये दीर्घकालीन बदल घडवून आणू शकेल, अशा एका मार्गावर आपल्याला घेऊन जाणाऱ्या परिवर्तनासाठीचे निमित्त शोधणेही महत्त्वाचे आहे. आपल्याला आहारदृष्ट्या जागरुक नागरिकांचा एक उत्साहपूर्ण समाज निर्माण करण्याची गरज आहे आणि प्रथिनांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असा मार्ग निवडणे हे भारतीय प्रोटीन डे सुरू करण्याच्या प्रयत्नांतील पहिले पाऊल असायला हवे.
प्रोटीन डे 2020 चे सूत्रच सर्व भारतीयांनी स्वत:ला आणि इतरांना एका प्रश्नाची आठवण करून देणारे आहे हा प्रश्न आहे. अर्थात आज आपल्या आहारात प्रथिने मिळवून देणारा कोणता पदार्थ आहे.
प्रथिनांबद्दल अधिकाधिक माहितीचा प्रसार करणे आणि भारतीयांनी आपल्या प्रत्येक आहारामध्ये पुरेशा किमान ताटातील पाव भागाइतक्या प्रथिनांचा समावेश करावा या दृष्टीने आपल्या भारतीयांनी आहारविषयक सवयींमध्ये बदल घडवून आणावा यासाठी पाठपुरावा करणे हा या दिनानिमित्त दिवसभर चालणाऱ्या उपक्रमांचा तसेच त्याहीपुढे सुरू राहणाऱ्या प्रयत्नांचा मुख्य हेतू असेल. हा संदेश भारतातील घराघरांत पोहोचवण्यासाठी राइट टू प्रोटीन मोहिमेने एक हलकाफुलका, माहितीपर व्हिडीओही प्रसारित केला आहे, ज्यात प्रत्येक भोजनामध्ये प्रथिनांचा समावेश करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
भारतामध्ये प्रथिनं आणि आहाराच्या योग्य सवयींविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजऱ्या होत असलेल्या पहिल्या इंडिया प्रोटीन डे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आहारशास्त्रातील तज्ज्ञांनी अधिक जागरुकता घडवण्याची गरज आहे.
यानिमित्ताने राष्ट्रीय आणि स्थानिक धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्पांमध्ये प्रथिनांचा पुरेशा प्रमाणात समावेश होण्याच्या दृष्टीने योग्य त्या संधी निर्माण करण्यास मदत करण्याची आमची इच्छा आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील भारतीयांनी आपल्या रोजच्या भोजनामध्ये पुरेशा प्रथिनांचा समावेश करण्याकडे अधिक लक्ष द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे ही या मोहिमेमागील संकल्पना आहे.
डॉ. जगमीत मदन