Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Rice Eating Tips: रोज भात खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

by
May 8, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Rice Eating Tips: भारतीयांच्या जेवणात भाताला विशेष महत्त्व आहे. अनेक लोकांच्या थाळीत भात नसेल तर जेवण अपूर्ण वाटते. काहींना तर रोज भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. मात्र भाताबद्दल एक समज अनेक वर्षांपासून ऐकायला मिळते, ते म्हणजे रोज भात खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे अनेक लोक वजन कमी करण्यासाठी भात खाणे कमी करतात किंवा पूर्णपणे बंद करतात. पण खरंच भातामुळे वजन वाढतं का? याबाबत आहारतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (Rice Eating Tips)

तज्ज्ञांच्या मते, फक्त भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. वजन वाढणे किंवा कमी होणे हे मुख्यतः शरीरात जाणाऱ्या एकूण कॅलरी, जीवनशैली आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. भात हा शरीराला ऊर्जा देणारा कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत भात खाल्ल्यास तो आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत नाही. ( Rice Eating Tips)

भातामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. याशिवाय त्यात थोड्या प्रमाणात प्रोटीनदेखील असते, जे स्नायूंना उपयोगी पडते. भातामध्ये बी जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी खनिजेही असतात. ब्राऊन राईसमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने पचन सुधारण्यास मदत होते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. (Rice Eating Tips)

तज्ज्ञ सांगतात की, समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा भाताचे प्रमाण जास्त होते किंवा त्यासोबत तेलकट आणि जास्त कॅलरीचे पदार्थ खाल्ले जातात. उदाहरणार्थ, जास्त तूप, तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूडसोबत भात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढू शकते.  (Rice Eating Tips)

रोज भात खाणाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. एका वेळेस एक वाटी भात पुरेसा मानला जातो. त्यासोबत डाळ, हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. त्यामुळे आहार संतुलित राहतो. तसेच रात्री उशिरा जास्त प्रमाणात भात खाणे टाळावे, विशेषतः शारीरिक हालचाल कमी असल्यास.  (Rice Eating Tips)

पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा हाताने कांडलेला तांदूळ अधिक चांगला पर्याय मानला जातो. कारण त्यात फायबर आणि पोषक घटक अधिक असतात. त्यामुळे पचन सुधारते आणि भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Rice Eating Tips)

तज्ज्ञांच्या मते, भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि संतुलित आहार याकडे लक्ष दिल्यास भात आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वजन वाढण्याच्या भीतीने भात टाळण्यापेक्षा तो योग्य पद्धतीने खाणे अधिक महत्त्वाचे आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar