Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Revdi Recipe: रेवडी कशी बनवायची? जाणून घ्या चारच साहित्यांत तयार होणारी सोपी रेसिपी

by
January 14, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Revdi Recipe: लोहडीचा सण पंजाब, हरियाणा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला रेवडी, गजक आणि शेंगदाणे खाण्याची खास परंपरा आहे. लोहडीच्या काळात बाजारात रेवडी सहज मिळते, पण बाजारातील मिठाई जास्त प्रमाणात खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं.

म्हणूनच यंदा लोहडीच्या सणासाठी घरीच रेवडी बनवायची असेल, तर ही अतिशय सोपी आणि चविष्ट रेसिपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. रेवडी बनवणं अजिबात अवघड नाही आणि ती फक्त चारच पदार्थांत तयार करता येते. घरची रेवडी चवीला ताजी, स्वच्छ आणि आरोग्यासाठीही चांगली असते.

रेवडीसाठी लागणारं साहित्य

तीळ – १ कप
गूळ – ३/४ कप
तूप – १ चमचा
वेलची पूड – १/४ चमचा

रेवडी बनवण्याची सोपी पद्धत

सर्वात आधी कढईमध्ये तीळ घालून मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या. तीळ हलके सोनेरी रंगाचे झाले आणि सुगंध येऊ लागला की ते गॅसवरून उतरवा. यामुळे रेवडी अधिक कुरकुरीत होते.

आता दुसऱ्या कढईत गूळ आणि तूप घालून मंद आचेवर गरम करा. गूळ जळू नये म्हणून सतत ढवळत राहा. गूळ पूर्णपणे वितळून घट्ट आणि थोडा चिकट झाला की त्यात भाजलेले तीळ घाला आणि नीट मिसळा. या मिश्रणात वेलची पूड घालून पुन्हा एक-दोन मिनिटे ढवळा. सर्व तीळ गुळात नीट माखले गेले पाहिजेत.

आता हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये ओता आणि चमच्याने किंवा लाटण्याने सपाट करा. साधारण २० ते २५ मिनिटे थंड होऊ द्या. मिश्रण घट्ट झाल्यावर हव्या त्या आकारात कापा.

चविष्ट आणि घरची रेवडी तयार आहे. यंदा लोहडीचा सण घरच्या घरी बनवलेल्या रेवडीने गोड करा आणि कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घ्या.

Join our WhatsApp Channel

The post Revdi Recipe: रेवडी कशी बनवायची? जाणून घ्या चारच साहित्यांत तयार होणारी सोपी रेसिपी appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar