Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Remedy For Acidity: एसिडिटीचा त्रास होतोय? घरच्या घरी करून बघा हे अचूक आयुर्वेदिक उपाय, मिळेल मोठा दिलासा

by
December 1, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Remedy For Acidity: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, झोपेचा अभाव आणि सततचा ताण यामुळे अनेकांना पोटाच्या तक्रारी सतावत असतात. त्यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे एसिडिटी. पोटात आम्लता वाढली की जळजळ, छातीत दुखणे, कडवट ढेकर, उलट्या होण्याची भावना अशा तक्रारी जाणवतात. यावर बहुतांश लोक त्वरित औषधे घेतात, पण आयुर्वेदात काही असे घरगुती उपाय सांगितले आहेत जे नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक आहेत.

थंड्या दुधाचा आणि केळ्याचा उपयोग

तज्ज्ञांच्या मते, पोटातील आम्लता वाढल्यावर थंड दूध पिणे अत्यंत उपयोगी ठरते. दुधातील कॅल्शियम आम्लता कमी करते आणि पोटातील जळजळ शांत करते. यासोबतच केळेही एसिडिटी कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. केळ्यातील नैसर्गिक अँटॅसिडसारखे घटक पोटातील त्रास कमी करतात आणि लगेच आराम देतात.

जीरे आणि ओवा… पचनासाठी सर्वोत्तम

भारतीय स्वयंपाकघरात जीरे आणि ओवा यांचा उपयोग पचनासाठी नेहमी होत आला आहे. जीरे पाण्यात उकळून ते कोमट स्वरूपात पिल्यास गॅस, फुगवल्याची भावना आणि एसिडिटी कमी होते. तसेच ओवा पाण्यात उकळून किंवा त्यावर थोडेसे काळे मीठ टाकून सेवन केल्यास पचन सुधारते आणि पोटातील स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे जळजळ, भारीपणा कमी होतो.

नारळ पाणी… नैसर्गिक थंडावा

नारळ पाणी शरीराचा pH स्तर संतुलित ठेवते. त्यातील नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आम्लता कमी करतात. पोटातील जळजळ कमी करण्यासाठी हे अतिशय परिणामकारक पेय मानले जाते.

बडीशोप… जुना पण खात्रीशीर उपाय

जेवणांनंतर बडीशोप चघळणे हा अनेक वर्षांपासून प्रचलित घरगुती उपाय आहे. बडीशोप पचनक्रिया सुधारते, गॅस कमी करते आणि अन्न लवकर पचण्यास मदत करते. नियमित बडीशोप सेवनाने एसिडिटीचा त्रास लक्षणीय कमी होतो.

वरील उपाय नैसर्गिक स्वरूपाचे असून बहुतेक लोकांना उपयोगी पडतात. मात्र त्रास वारंवार होत असेल किंवा खूप वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

Join our WhatsApp Channel

The post Remedy For Acidity: एसिडिटीचा त्रास होतोय? घरच्या घरी करून बघा हे अचूक आयुर्वेदिक उपाय, मिळेल मोठा दिलासा appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar