कुठल्याही नाते घट्ट होण्यासाठी नेहमीच विश्वास हा महत्वाचा असतो. नात्यात विश्वास असला तर प्रेम वाढत जात मात्र अनेक वेळा नात्यातील हा विश्वास कमी झाला तर नात्यात फूट निर्माण होते. अशा वेळी प्रेम असतांना सुद्धा ब्रेकअपचीही वेळ येते. याबाबत बॉडी लॅंग्वेज एक्सपर्ट सांगितले आहेत ज्यावरून समजू शकते की, तुमचा पार्टनर आता नाते पुढे नेण्यास इच्छूक नाही. हे संकेत कोणते ते जाणून घेवूयात
पार्टनरला ब्रेकअप करायचे असेल तर तो डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही. बोलताना खाली पहात राहील. तो तुम्हाला तेव्हा पाहतो जेव्हा तुमचे लक्ष त्याच्याकडे नसेल. याचा अर्थ आहे की त्याने स्वताला ब्रेकअपसाठी तयार केले आहे. तर एकमेकांमध्ये दोष काढणे. ब्रेकअप करण्याचे विचार असणारा आपल्या पार्टनरमधील दोष काढत राहतो जेणेकरून तो ब्रेकअपसाठी स्वताला कमी दोषी मानू शकतो. याशिवाय डोळे फिरवून बोलणे, पार्टनरच्या हातांना झटका देणे आणि छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद घालणे हे ब्रेकअपचे संकेत आहेत.
ब्रेकअप करण्याच्या दबावात काही लोक स्वताला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. जसे की, एखाद्या वस्तूशी खेळणे, स्वताला सावरणे आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे. सामान्यपणे कपल्स एकमेकांना टच करतात आणि जवळ राहतात. ब्रेकअपच्या स्थितीत लोक एकमेकांच्या जवळ जाणे टाळतात. एकमेकांच्या जवळसुद्धा बसत नाहीत.रिलेशनशिप संपवणारे फोनचा वापर जास्त करतात. पार्टनरचा सामना कमी करण्यासाठी ते फोनमध्येच गुंतलेले असतात. ते फोनबाबत जास्त सतर्क दिसतात. ( extra marital affair )