Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#रिलेशनशीप : जावे आनंदाच्या गावा…

by प्रभात वृत्तसेवा
December 25, 2020
in रिलेशनशीप
A A
#रिलेशनशीप : जावे आनंदाच्या गावा…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

“आनंदी आनंद गडे ,
इकडे तिकडे चोहीकडे ”
“बालकवी” त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या या ओळीप्रमाणेच ‘निसर्गातच भरुनी आहे आनंदी आनंद!’ खरंच का आनंदाला शोधावे लागते? क्वचित वेळा असेलही ,पण तरीही मला वाटते ‘नाही! तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी…’ अशीच काहीशी आपली वृत्ती असते . आनंद आपल्या मनात झिरपत असतो, त्याचा ठेवा आपल्याच मनात असतो पण आपण कस्तुरीमृगासारखे पिसाट धावत सुटतो त्याच्या मागे त्याला शोधायला.

इकडे तिकडे वेड्यासारखे शोधतो त्याला पण तो असतो निनादत अंतर्मनातून आपल्याच मनात पण आपण शोधतो त्याला भौतिक गोष्टीत, भौतिक सुखात आणि या भौतिकांचा कधीतरी कंटाळा येतोच आणि मग आपण दुःखी होतो. आपल्याला कुणीतरी आनंद द्यावा, आनंदी करावे वाटते पण आनंद घेण्याने नाही तर देण्याने आपण आनंदी होतो हे विसरतो.

मधमाशी कणाकणाने मध साठवते पण सुमधुर मधाचे पोळे केवढे मोठे होते नाही? असेच जीवनात आनंदाचे क्षण क्षण गोळा करावे लागतात. मगच आनंदाचा ठेवा पोळ्यासारखा दिवसेंदिवस मोठाच होत राहतो. या सुमधुर आनंदी साठवणींचा आनंद काही औरच!

रणरणत्या उन्हात गर्द सावली देणाऱ्या झाडाखाली विसावलाय कधी? निष्पाप बालकाचे स्वत:शी स्मित पाहून हरखलाय कधी? कधी लहान मुलासारखा उन्हात मृगजळ पकडण्याचा प्रयत्न केलाय का? शेतात डोलणाऱ्या सळसळत्या पिकात स्वतःला हरवून बसलाय का कधी? बघा, आनंदाचे अख्खे गाव कसे वसलेय आपल्याभोवती. शेतात वाहणाऱ्या मधुर झऱ्याचे पाणी ओंजळीतून पिलाय कधी? ओढ्यांचे खळखळणे, वेलीवर फुलं उमलणे, फुलपाखरांचे लयबद्ध भिरभिरणे अनुभवलंय कधी? शेतातल्या वनराईतून कुहू-कुहूच्या आवाजामागे धावलाय? जमिनीवरची, घरट्यातली वेगवेळ्या पक्ष्यांची अंडी, इवलीशी नाजूक पिल्लं पाहिलीत कधी?

तापलेल्या जमिनीवर पावसाने पसरणारा मृदगंध, अवचित समोर येऊन नाचणारा मोर पाहून हरखलाय कधी? संध्याकाळी सूर्यास्त होतानाचे लोभस बिंब, चंद्रोदय होताना झाडा मागचा त्याचा लपंडाव, रात्रीच्या निरव शांततेत लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश, रातव्याची किरकिर, दुरून कुठून तरी येणारा रातराणीचा श्‍वास भरुन जाणारा सुगंध, निष्पाप कोकरांचे बागडणे, छोट्या वासराचे त्याच्या आईला लुचणे अन फेसाळते दूध त्याच्या ओठांवरून घरंगळणे, भरलेल्या कणसांवर पिकांवर डोलतच सावधपणे दाणे टिपणारी पाखरे!

खरंच आनंदाचे कितीतरी झरे आपल्याभोवती झुळझुळत असतात की एक आयुष्यच कमी पडावे! आनंदी दृष्टी असणारी, जिच्या मनात आनंदी आनंद भरून आहे, जी आपल्या प्रेमळ वागण्याने दुसऱ्यांस आनंद देते, तीच सर्वात आनंदी व्यक्ती ! पुस्तकांच्या दुनियेत हरवणारी व्यक्तीही सर्वात आनंदी असते कारण पुस्तकात रमणारी व्यक्ती पुस्तकातील जगात वातावरणात एकरूप होते, तादात्म्य पावते. आवडीच्या गाण्यांची धून कोणत्याही क्षणी आपल्याला आनंदीच करते.

दिवाळीची चाहूल लागताच निरभ्र होणारे आकाश, दूरवर पसरलेली उबदार थंडी, तेला- उटण्याने भावाला घातलेलं अभ्यंग, नवीन कपड्यांचे नवे गन्ध, एकत्र कुटुंबाचे हास्य विनोद, चांदण्या रात्री शाल लपेटून मोकळ्या अंगणात मारलेल्या गप्पा अन गप्पातच हळूच मिटलेले डोळे! हे सर्व माझ्यासाठी आनंदाचे ठेवे आहेत. जिथं निरपेक्ष प्रेमानं नाती एकत्र येतात, पुनः भेटीची ओढ लावतात, तिथं आनंदाचे गोकुळ अन्‌ या गोकुळात आनंदी कृष्णही असणारच ना ??

– सुचित्रा पवार

Tags: aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardBenefitsरिलेशनशीप
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar