Thursday, November 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Relationship : नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ प्रेमाचे मंत्र; जोडीदार तुमच्यावर होईल फुल्ल फिदा !

by
November 5, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Relationship : प्रेमाचं नातं म्हटलं की रुसवे-फुगवे, भांडणं आणि मतभेद आलेच! सुरुवातीला एकमेकांशिवाय क्षणभरही न राहणाऱ्या जोडप्यांमध्ये कालांतराने छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागतात. कधी एखाद्या शब्दाचा राग येतो, तर कधी जोडीदाराने दिलेला वेळ किंवा लक्ष कमी झाल्यामुळे मन दुखावतं.

अनेकदा या छोट्या भांडणांचं रूपांतर मोठ्या वादात होतं आणि मग सुरू होतो अबोला, एकमेकांना दोष देण्याचा खेळ आणि कोण आधी माफी मागणार याची प्रतीक्षा! पण नातं टिकवायचं असेल, तर प्रत्येक वेळी कोण बरोबर आणि कोण चूक याचा हिशेब मांडून चालत नाही. कारण नात्यातील सर्वात मोठा विजय हा जोडीदाराला हरवण्यात नसून एकमेकांची मनं जिंकण्यात असतो.

अनेकदा एखाद्या चुकीबद्दल मनापासून माफी मागणं किंवा जोडीदाराची चूक समजून घेऊन त्याला क्षमा करणं, यामुळे नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. प्रेमासोबतच नात्यात परस्पर आदर, विश्वास आणि संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमच्याही नात्यात सतत रुसवे-फुगवे होत असतील आणि छोट्या भांडणांमुळे दुरावा वाढत असेल, तर या ४ गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

१. अहंकार बाजूला ठेवा, मन मोठं करा!

पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात कधी ना कधी एकमेकांकडून चुका होतातच. कधी जोडीदाराच्या एखाद्या वागण्यामुळे मन दुखावतं, तर कधी नकळत बोललेला एखादा शब्द जिव्हारी लागतो. अशा वेळी रागाच्या भरात नातं संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शांतपणे परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे.

तुमच्या जोडीदाराकडून चूक झाली असेल आणि त्याला त्याची जाणीव असेल, तर त्याला ती चूक सुधारण्याची संधी द्या. त्याचप्रमाणे स्वतःकडून चूक झाली असेल, तर ती मान्य करण्याचं धाडस ठेवा. प्रत्येक वेळी स्वतःचंच म्हणणं खरं करण्याचा हट्ट धरल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

२. भांडण थांबवा, संवाद सुरू ठेवा!

नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर अनेकदा दोघेही एकमेकांशी बोलणं बंद करतात. कोण आधी बोलणार, कोण आधी माफी मागणार, यावरून अबोला आणखी वाढतो. पण यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गैरसमज वाढण्याची शक्यता असते.

अशा वेळी थोडा वेळ शांत राहणं योग्य असलं, तरी कायमचा अबोला धरणं नात्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जोडीदाराचा राग शांत झाल्यानंतर स्वतःहून संवाद सुरू करा.

३. मनापासून माफ करा, पण चुकीची पुनरावृत्ती होऊ देऊ नका!

जोडीदाराकडून चूक झाल्यानंतर त्याला त्याची जाणीव झाली असेल आणि तो मनापासून पश्चात्ताप व्यक्त करत असेल, तर त्याला माफ करण्याचा विचार करा. प्रत्येक वेळी जुन्या चुका उकरून काढल्याने नात्यातील जखमा पुन्हा ताज्या होतात. त्यामुळे एखादी गोष्ट मनापासून मिटवण्याचा निर्णय घेतला असेल, तर ती वारंवार भांडणात आणू नका.

कधी कधी जोडीदार थेट माफी मागत नसला, तरी त्याच्या वागण्यातून समेट करण्याची इच्छा दिसू शकते. अशा वेळी त्याच्याशी मोकळेपणाने बोला. ‘ठीक आहे, झालं गेलं विसरून जाऊया; पण पुन्हा असं होऊ देऊ नकोस,’ असं सांगून नात्याला नवी संधी देता येते.

४. चूक झाली असेल तर बिनधास्त ‘सॉरी’ म्हणा!

नात्यातील अनेक वाद केवळ एका मनापासूनच्या माफीने कमी होऊ शकतात. मात्र, काही लोकांना स्वतःची चूक मान्य करणं कठीण जातं. त्यांना वाटतं की आधी माफी मागितली, तर आपण कमीपणा घेतला. पण प्रत्यक्षात माफी मागणं ही कमजोरी नसून नात्याप्रती असलेली प्रामाणिकता आहे.

तुमच्या एखाद्या कृतीमुळे जोडीदाराचं मन दुखावलं असेल, तर कारणं देत बसण्यापेक्षा सरळ चूक मान्य करा. ‘माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ एवढं मनापासून सांगणंही महत्त्वाचं ठरू शकतं. त्याच वेळी जोडीदाराचं म्हणणं शांतपणे ऐका आणि भविष्यात तीच चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्या.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar