
relationship : नातं तुटल्यावर…
June 18th, 10:09amJune 18th, 10:09am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
सध्या रिलेशनमध्ये राहण्याचा ट्रेन्ड आहे. याचा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. जीवनात आनंदाचे क्षण पाखराप्रमाणे असतात. थोडाजरी आवाज झाला तरी पाखरे उडून जातात.
तसे जीवनात काही वादळ आल्यास जीवनातील आनंद पाखराप्रमाणे उडून जातो. रिलेशनशिपमध्ये असणारे आनंदाच्या डोहात डुंबत असतात. मात्र रिलेशन तुटल्यानंतर आनंदावर दु:खाची काळी छाया पसरते. अशा स्थितीत तरुण असो वा तरुणी नैराश्यग्रस्त होतात.
पुढील आयुष्य जगण्यात आता काही अर्थ नाही, या विचारापर्यंत येऊन ते थांबतात. खरे तर रिलेशन तुटल्यानंतर मानसिक संतुलन ढासळते. त्यामुळे तुमच्या मनात असे विचार येणे साहजिकच आहे. रिलेशन तुटल्यानंतर बरेचजण एकटे राहटे राहतात. मात्र एकलकोंडा नेहमी योग्य नाही. अशा वेळी मित्रांच्या सहवासात राहा. त्यामुळे तुम्ही लवकर या परिस्थितीतून बाहेर पडाल.
मात्र काही याविरुद्ध असतात. रिलेशेन तुटल्यावर ते अगदी आपण सुटलो एकदाचे असे म्हणून नव्याने आयुष्याला सुरुवात करतात. यातील दुसरा मार्ग योग्य ठरतो. कटू आठवणी मनातून काढून टाकल्यास जगण्याची नवी उमेद मिळते. रिलेशन तुटल्यानंतरही त्यातून धडा मिळतो. ज्या चुका अगोदर झाल्या आहेत त्या पुन्हा न होण्यावर भर द्या आणि पुढील आयुष्य आनंदात जगा.