साहित्य
शिजवून आटवूनघेतलेला आंब्याचा मावा एक वाटीभर, रवा अर्धी वाटी, साखर
अर्धी वाटी, सुके खोबरे कीस व खसखस एकत्रित भाजून दोन वाटी, काजूचे पातळ काप पाव वाटी, तूप अर्धी वाटी. (Mango receipe , Ladoo receipe )
कृती
आंबा रस मावा आणि साखर एकत्र करून मंदाग्रीवर ठेवा. घुसळून मित्रण दाटसर गोळा होईपर्यंत आचेवर ठेवा. त्यात थोडे थोडे तूप टाकत राहा म्हणजे दाटसर गोळा होईल. मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात स्वा आणि काजू काप टाकून मिश्रण चांगले घुसळा. घट्ट गोळा होऊ द्या. तोपर्यंत खोबरे कीस व खसखस थोडी भाजून एका थाळीत एकत्र करून पसरून ठेवा. आंबा मावा पट्टसर झाला की खाली उतरून थोडं निवल्यानंतर त्याचे लाडू वळा खोबरे खसखस मिश्रणात घोळवून बाजूला ठेवा. आंबा लाडू तयार(Mango receipe , Ladoo receipe )