साहित्य :
दोन वाट्या मोडाची मटकी, अर्धा नारळ, एक चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, सुपारीएवढा कोथिंबीर-कढीपत्ता, चार चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग
कृती :
पातेल्यात चार चमचे तेल घालून फोडणी करावी. त्यावर हिंग, हळद, कढीपत्ता, तिखट, मसाला आणि मोड आलेली मटकी घालावी. खोवलेला नारळ, मीठ, गूळ, कोथिंबीर सर्व घालून चांगली शिजवावी, पानावर वाढावी.याच प्रकारे मूग, चवळी, काळ्या-हिरव्या वाटाण्याची उसळ करतात. चवळीच्या व मसूरच्या उसळीत दोन आमसुले घालावीत.