साहित्य ः एक वाटी चणा डाळ, एक वाटी मूग डाळ, एक वाटी अख्खे मसूर, एक वाटी बारीक शेव, एक चमचा शेंदेलोण आणि पादेलोण, प्रत्येक कडधान्यासाठी चिमूटभर खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल
कृती ः पाण्यात सोडा घालून सर्व डाळी, कडधान्य वेगवेगळे भिजत घालावीत. रात्रभर पाण्यात ठेवावीत. सकाळी सवग् वेगवेगळ्या फडक्यांवर उपसून टाकावीत. सुकल्यावर तळावीत. त्यात शेंगदाणे, पादेलोण घालून घालून एकत्र कालवावीत. त्यात शेव घालावी. खाण्यास देताना लिबू पिळून खाण्यास द्यावी.