साहित्य :
किसलेले खोबरे १ मध्यम वाटी, कैरीचा कीस अधी वाटी, आंबट असल्यास पाव वाटी. एक मोठा किसलेला कांदा लाल तिखट एक मोठा चमचा, एक मोठा चमचा गूळ अगर साखर, १ छोटा चमचा मीठ.
कृती :
वरील सर्व जिन्नस चमचाने सारखे करून वरून त्यावर हिंग, थाडी हळद याची पोडणी देऊन सारखी करावी. ही चटणी चार दिवस टिकते. कैरी नसल्यास आमचूर वालावा अगर लिंबू पिळावे