साहित्य : शेवग्याच्या शेंगा तीन – चार , सुकं खोबरं , चिंच , गुळ गोड मसाला दोन चमचे , लाल तिखट एक चमचा , धने – जीऱ्याची पूड ,दोन चमचे भाजलेले दाणे अर्धी वाटी , लाल तिखट
कृती : शेवग्याच्या शेंगाचे बेताचे तुकडे करून ते पाण्यात टाकावेत . थोडया पाण्यात चमचाभर मीठ टाकून ते उकडून घ्यावेत . चिंच भिजवून चिंचेचा कोळ करून घ्यावा . सुकं खोबरं भाजून , गोड मसाला , लाल तिखट , धने – जीऱ्याची पूड , भाजलेले दाणे अर्धी वाटी हे सर्व एकत्र करून थोडं पाणी घालून वाटून घ्यावं .
पातेलीत फोडणी करताना कढीपत्ता टाकावा . त्यावर हा वाटलेला गोळा टाकून परतावा . मीठ , गुळ , चार चमचे चिंचेचा कोळ घालावा . याच मिश्रणात तीन – चार वाटया पाणी घालून पातळ करावं . उकळी आली की उकडलेल्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे अलगद आत सोडून पुन्हा आमटीप्रमाणे उकळू द्यावं .