साहित्य:
हरभरा डाळ अर्धी वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, पाव वाटी मूग डाळ, वडे करण्याच्या आधी सुमारे तीन- चार तास भिजत टाकावीत. चार-पाच हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, छोटा चमचा मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा इंच आले, पाव वाटी कोथिंबीर, आवडत असल्यास पुदिन्याची पंधरा-वीस पाने, दोन मोठे चमचे कडकडीत तेलाचे मोहन.
कृती :
चार तास भिजल्यानंतर सर्व डाळी एक डाव पाणी घालून मिक्सरवर बारीक करून घ्याव्यात. नंतर त्यात आले. मिरच्या बारीक वाटून घालावे. तसेच बारीक चिरून कोथिंबीर, हिंग, मीठ, तेलाचे मोहन असे सर्व पालून एकजीव करावे. नंतर चमच्याने अगर हाताने वडे तळण्यास टाकावेत. मिश्रण कालवून तखन बऱ्याच वेळाने वडे करणे झाल्यास मिश्रण फार सैल वाटल्यास एक हाच डाळीचे पीठ टाकावे. नाहीतर कधी कधी वडे तेल जास्त खातात. यात कांद्याएवजी लसून ठेचून घातल्यासही चांगले लागते.