साहित्य:
(१) दोन वाट्या पांढरे वाटाणे-दोन
तीस तास भिजवलेले (२) एक चमचा गोडा मसाला (३) अर्धा चमचा मीठ (४) सुपारीएवढा गूळ (५) दोन- तीन हिरव्या मिरच्या (६) कोथिंबीर-कढीपत्ता फोडणीचे
साहित्यः
(१)चार चमचे तेल (२)अर्धा चमचा मोहरी (३) अर्धा चमचा हळद (४)पाव चमचा हिंग.
कृती:
पातेल्यात तेलाची फोडणी करून त्यात हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या घालाव्यात आणि नंतर उकडलेले वाटाणे घालावेत. मीठ, पाणी, मसाला, गूळ, कढीपत्ता वगैरे घालून चांगले भिजवावे. वाढताना कोथिंबीर, कढीपत्ता घालावा. दोन- तीन जणांना पुरते. ( Vatana Usal Recipe , White Peas Curry )