साहित्य :
दोन वाट्यापांढरे वाटाणे (भिजवूनउकडलेले), दोन कांदे, तीनवाट्या पाणी, दोन चमचे धना-जिरापावडर, चमचा मीठ, दोन चमचेलाल तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता. पाच सहा चमचे तेल, अर्धा चमचा हिंग. या फोडणीत मोहरी किंवा हळद घालत नाहीत.
कृती :
कांदा बारीक चिरून घ्यावा. पातेल्यात तेल तापल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता, तिखट घालून त्यावर कांदा लालसर परतवून घ्यावा. नंतर उकडलेले वाटाणे, मीठ, धना-जिरा पावडर, पाणी घालून खूप शिजवावे. नंतर कोथिंबीर घालावी.