साहित्य ः काजू एक वाटी, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा, वेलदोडापूड पाव चमचा.
कृती ः काजूची मिक्सरवर पूड करून घ्यावी. खवा हाताने मळून घ्यावा. काजूची पूड, साखर व खवा, पाव वाटी दूध असे एकत्र करून शिजत ठेवावे. गोळा कडेने कोरडा होऊ लागलेला दिसताच गॅस बंद करून मिश्रण कोमट होईपर्यंत घोटावे. ताटाला किंवा पोळपाटाला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण ओतावे व वड्या कापाव्यात. खव्यामुळे वड्यांचे मिश्रण लवकर तयार होते.