अप्पे जर तुम्हाला उद्या बनवायचे असतील तर त्या साठी तुम्हाला त्याच पीठ आजच्या रात्री तयार करून ठेवायचं आहे .ते कसं तयार करायच आता आपण ते बगूया
सर्वात प्रथम एका भांड्यात तांदूळ घ्या त्यातील सर्व घाण दूर करा आणि स्वछ पाण्याने चांगले धुऊन घ्या.आता त्या तांदूळ मध्ये उडीद डाळ घाला आता यात भरपूर पाणी घाला तांदूळ आणि डाळ भिजेल इतपत आता त्यावर झाकण ठेऊन 2 तास भिजू द्या.
2 तास भिजून झाले की स्वछ धुऊन घ्या नंतर त्याला गाळून मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या
आता त्याला दळून घ्या दळतानी त्यात एक कप पाणी घाला आणि नरम असं दळून घ्या.
आता हे मिश्रण एका खोल पातेल्यात काढून घ्या .त्यावर बसेल असं वेवस्तीत झाकण ठेवा आणि हे मिश्रण 8 तास भिजू द्यायचं असंच.
आता पीठ 8 तास झाले कि आपल अप्पे बनवायचं पीठ तयार आहे आपण आता लगेच त्याचे अप्पे बनवू शकतो. अप्पे मध्ये आपल्याला वरील सर्व पदार्थाची फोडणी करून टाकायची आहे. फोडणीसाठी गॅस वर एक पॅन ठेवा त्यात थोडे तेल गरम करायला ठेवा तेल छान गरम झाले की जिरे,मोहरी,कढीपत्ता घाला ते चांगले तडतडले कि थोडं हिंग,हिरवी मिरची चिरलेली, कांदा टाका .कांदा चांगला झाला की मग त्यात शेंगदाण्याचा कूट घाला.आता ही फोडणी अप्पे च्या पीठ मध्ये टाका आणि मस्तपैकी एकत्र करून घ्या.
अप्पे रेसिपी
बनवण्यासाठी गॅस वर आप्पेपात्र ठेवा .त्याला ब्रश ने मधून तेल लावून घ्या.आता त्यात अप्पे चे पीठ टाका आणि झाकण ठेवून द्या थोड्या थोड्या वेळाने बगा म्हणजे अप्पे जळणार नाहीत एका बाजूने छान भाजून झाले की दुसऱ्या बाजूने पलटा अशा प्रकारे अप्पे दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.हिरवी मिरची,टोमॅटो चटणीकिंवा सांबर सोबत गरमागरम सर्व्ह करा