साहित्य –
मेथी भाजी १ जुडी , मोठा कांदा १ , टोमँटो १ , आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून , चणाडाळ पीठ १ टेस्पून , मीठ चविनूसार , धना-जिरा पावडर २ टीस्पून , तेल न फोडणी हिंग, मोहरी
कृती –
प्रथम मेथी निवडून धुवून बारीक चिरावी. कांदा,टोमँटो बारीक चिरावे. आता तेल गरम करून फोडणी करून त्यामधे कांदा, टोमँटो व आलं लसूण पेस्ट परतावी. शेवटी चिरलेली मेथी टाकावी व एक वाफ काढावी भाजी खाली बसते.
नंतर मीठ व डाळीचे पीठ अर्धी वाटी पाण्यात कालवून भाजीमधे घालावे. गरजेनुसार अजून थोडे पाणी घालावे व थोडे शिजू द्यावे. जास्त पाणी घालू नये. ही भाजी घटसरच असते. आता ही तयार गरमा-गरम भजी भाकरी अथवा चपाती सोबत वाढा. अतिशय रूचकर लागते.