साहित्य
१ कप साधा तांदूळ , १ कप जाड तांदूळ , १/४ कप उडीद डाळ (पांढरी) , १/२ चमचा मेथ्या (बिया) , १/२ चमचा खाण्याचा सोडा
१/२ कप दही , १०-१२ चमचा तूप किंवा तेल (आवडीनुसार) पाणी
कृती-
तांदूळ आणि डाळ एकत्र धुऊन घ्या. त्यात पुरेसं पाणी घाला आणि २-४ मेथ्या टाका. ७-८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.तांदूळ पुन्हा २-३ वेळा धुऊन घ्या. त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.(पीठ राव्यासारखे होईपर्यंत) त्यात खाण्याचा सोडा आणि मीठ घालून चांगले एकत्र करा. ८-१० तासासाठी बाजूला ठेवून दया. दही व्यवस्थित फेटून घ्या. वरील पिठात घालून, गरजेनुसार पाणी घाला.
पीठ चमच्यावर राहील एवढं घट्ट असलं पाहिजे. नॉन स्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून घ्या. प्रथम थोडं पीठ तव्याच्या मध्यभागी घालून नंतर चमच्याच्या मागील बाजूने पसरून घ्या. त्यावर १ चमचा तूप किंवा तेल ओता. भाजल्यावर चमच्याने काढून घ्या. नंतर त्याला चमच्याने कट करत ३ ते ४ भाग करा गरमगरम चटणी किंवा सांभार बरोबर सर्व्ह करा.