साहित्य
जाड तांदूळ (उकडा नाही) दोन वाटय़ा, उडीद डाळ एक वाटी, चणा डाळ अर्धा वाटी, मेथी दाणे आणि जिरे अर्धा-अर्धा चमचा.
कृती
डाळी आणि तांदूळ आदल्या दिवशी सकाळी वेगवेगळे भिजत घाला. साधारण पाच ते सहा तास भिजल्यानंतर वाटून घ्या. डाळी मुलायम वाटा पण तांदूळ जरा खसखशीत ठेवा. सर्व एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्या. ओतण्या इतपत ठेवा. मीठ आणि किंचित साखर घालून सात-आठ तास आंबवण्यासाठी झाकून ठेवा.
दुसऱ्या दिवशी अलगद सारखे करून, तव्यावर तेल घालून मध्यम आंबोळ्या काढाव्यात. दोन्ही बाजूंनी लालसर शेकून खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्या.
(लुसलुशीत आंबोळी , Amboli with Simple Tips , Maharashtrian Recipe )