साहित्य : एक जुडी पालक, दोनशे ग्रॅम पनीर, अर्धा चमचा मीठ, दोन-तीन मिरच्या बारीक चिरून, दहा-पंधरा काजू, तळण्यासाठी तेल
कृती: प्रथप पालक बारीक चिरून घ्यावा. त्यात पनीर, मीठ, मिरची घालून मळून एकजीव करून घ्यावे. लहान लहान गोळे चपटे करून त्यावर काजुची फाक लावून कबाब तळून घ्यावेत. चिंचेची चट्णी, पुदिन्याची पातळ चट्णी, दह्याच्या हिरच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावे.