लिंबाचे लोणचे ( pickles recipe )
साहित्य – अर्धा किलो लिंबू, 100 ग्रॅम आले (साल काढून पातळ काप केलेले) अडीच टेबलस्पूून मीठ, अडीच टेबलस्पूून काळे मीठ, दीड टेबलस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हिंग, 1 कप साखर, तीन टेबलस्पून ओवा, पाव टेबलस्पून मोहरीची जाडसर पूड, एक टेबलस्पून गरम मसाला.
कृती – लिंबाला चार उभ्या चिरा द्या. मात्र लिंबू अखंड रहायला हवे. त्याच्या फोडी करु नका. एका स्टीलच्या भांड्यात लिंबा व्यतीरिक्त उर्वरीत सर्व साहित्य एकत्र करुन त्याचे एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण लिंबाच्या चिरांमध्ये व्यवस्थीत भरा. नंतर या लिंबांना सुती कपडा बांधा आणि 30 दिवसांकरीता कडक उन्हात ठेवा. नंतर त्याचे लोणचे ( pickles recipe ) काचेच्या हवाबंद बरणीत भरुन ठेवा.
भरवा मिरचीचे लोणचे ( pickles recipe ) –
साहित्य – अर्धा किलो मोठ्या लाल मिरच्या, दीड टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून बडीशेप, 4 टेबलस्पून मोहरी पूड, 2 टेबलस्पून आमचूर पूड, 7 टेबलस्पून मीठ, 3 लिंबांचा रस, 1 कप मोहरीचे तेल, 1 टीस्पून हिंग.
कृती – मिरच्या धुऊन कोरड्या करुन देठ काढून घ्या. मिरच्यांना देठापर्यंत एक चिर देऊन त्यामधील सर्व बिया काढून टाका. जिरे, मोहरी आणि बडीशेप मंद आचेवर सुकेच भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्समधून जाडसर वाटून घ्या. त्यात मोहरी पूड, आमचूर व मीठ एकत्र करा. त्यात लिंबू रस ( pickles recipe ) मिसळून जाडसर एकजीव मिश्रण तयार करुन घ्या. मिरच्यांमध्ये हे मिश्रण व्यवस्थीत भरा. या भरलेल्या मिरच्या काचेच्या रुंद झाकणाच्या बरणीत व्यवस्थित भरा.
फोडणीसाठी मोहरीचे तेल गरम करुन तेलावर वाफा येऊ लागल्या की त्यात हिंग घालून लगेच आच बंद करा. हे गरमागरम तेल बरणीतील मिरच्यांवर घाला. बरणीवर सुती कापड बांधून, ती 8 ते 10 दिवस उन्हात ठेवा. बरणी दररोज हळुवार थोडी हलवा म्हणजे सर्व मिरच्यांना व्यवस्थीत तेल लागेल.
खजुराचे लोणचे – ( pickles recipe )
साहित्य – पाव किलो खजूर (बीविरहीत), 1 टेबलस्पून ओल्या हळदीची पेस्ट, 1 टेबलस्पून गूळ (किसलेला), पाव टीस्पून मीठ, पाव टी स्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड.
कृती – एका खजुरा ( pickles recipe ) दोन भाग करुन 2 दिवस कडक उन्हात सुकत ठेवा. जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करुन त्यात उर्वरीत सर्व साहित्य घआला. व्यवस्थीत एकत्र करुन मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत शिजवा. नंतर त्यात खजूर चांगले एकत्र करा. ( pickles recipe ) आचेवरुन उतरवून थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरुन त्यावर सुती कापड बांधा. ही बरणी काही दिवस उन्हात ठेवा.