Saturday, November 8, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Recipe For Skin And Hair: केस गळणं कमी करायचं आहे आणि त्वचा चमकवायची आहे? तर, काही मिनिटांत बनणारा ‘हा’ लाडू खा…

by
November 1, 2025
in लाईफस्टाईल
A A
Recipe For Skin And Hair: केस गळणं कमी करायचं आहे आणि त्वचा चमकवायची आहे? तर, काही मिनिटांत बनणारा ‘हा’ लाडू खा…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Recipe For Skin And Hair: आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर होतो. म्हणूनच आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण अनेकदा मन “थोडं गोड खावंसं वाटतं” इथेच अडकून बसतं. म्हणून आज आपण जाणून घेऊया, एक असा स्वादिष्ट आणि पौष्टिक बायोटिन लाडू जो केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि तो तुम्ही काही मिनिटांत घरच्या घरी बनवू शकता.

लाडूमध्ये लागणारी सामग्री

काळे तीळ
पांढरे तीळ
सूर्यफुलाचे बी
जवसाचे बी
भोपळ्याचे बी
खजूर
थोडंसं तूप

लाडू बनवण्याची सोपी पद्धत

1. सर्व बी थोडेसे भाजून घ्या किंवा तयार भाजलेले बी वापरा.

2. हे भाजलेले बी मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घ्या.

3. कढईत थोडं तूप गरम करून त्यात खजूर टाका आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा.

4. खजूर मॅश करून त्यात दळलेले बी मिसळा.

5. मिश्रण थंड झाल्यावर लहान लाडू वळून घ्या.

या लाडूचे आरोग्यदायी फायदे

केसांची वाढ सुधारते आणि केस मजबूत होतात
केस गळणे कमी होते
टाळू (स्कॅल्प) निरोगी राहते
त्वचेला पोषण मिळते आणि नैसर्गिक चमक वाढते
त्वचेची लवचिकता सुधारते
कोलेजन निर्मिती वाढते
वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात
नखं मजबूत होतात

तिळाचे फायदे

तिळामध्ये विटामिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात. हे त्वचेला मॉइश्चराइज ठेवतात, सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेची लवचिकता वाढवतात.

बियांचे फायदे

जवसाचे बी आणि भोपळ्याचे बी हे दोन्ही त्वचा आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा उजळ आणि निरोगी ठेवतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये विटामिन ई आणि झिंक असतात, जे त्वचेला ओलावा देतात, सुरकुत्या कमी करतात आणि केस गळणे थांबवतात.

खजुराचे फायदे

खजूरमध्ये विटामिन ई, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला ओलावा देतात आणि केसांच्या मुळांना मजबुती देतात. खजूरामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि केसांची वाढ सुधारते.

थोडक्यात: दररोज एक बायोटिन लाडू खाल्ल्यास केस गळणे कमी होते, त्वचा तेजस्वी दिसते आणि शरीरालाही आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात.

 

Join our WhatsApp Channel

The post Recipe For Skin And Hair: केस गळणं कमी करायचं आहे आणि त्वचा चमकवायची आहे? तर, काही मिनिटांत बनणारा ‘हा’ लाडू खा… appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar