साहित्य :
दोन वाट्या गहू, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी सोयाबिन, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी नाचणी, एकमूठ उडदाचे डाळ, एक चहाचा चमचा मेथ्या, गूळ, साजूक तूप आणि स्वादासाठी आठ-दहा वेलदोडे ( Recipe Nutritious laddu )
कृती :
वरील सर्व धान्य वेगवेगळे भाजून घ्यावे. सोयाबिन भाजल्यावर त्याचे टरफल काढून टाकावे. (शेंगदाण्यासारखे त्याचे टरफल निघून जाते) हे सगळे भाजलेले मिश्रण तुपावर बेसन लाडू करताना आपण पीठ भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यावे. सगळी पीठ एकजीव झाल्यावर त्यात गूळ घालून याचे लाडू बांधावेत. हे लाडू आजारी माणसासाठी तर चांगले ठरतातच; पण प्रवासातही त्याचा उपयोग करता येतो.( Recipe Nutritious laddu )