कृती :
सर्वप्रथम काकडीला चांगले धुऊन किसणीने बारीक करून घ्या.
एक मोठ्या भांड्यात किसलेली काकडी घ्या. त्यात बेसन व ज्वारीचे पीठ टाका . जिरे, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, कांदा, ओवा व मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या.
बेसनाच्या गाठा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर तवा ठेऊन छोट्या चमच्याने थोडे तेल पसरवा, तेल गरम झाले की एका मोठ्या चमच्याने किंवा हाताने थोडे मिश्रण तव्यावर टाकून गोल आकार द्या.
थोडे तेल धोपटीच्या भोवताली सोडा, धपाटा थोडावेळ भाजू द्या आणि एखाद्या सराट्याच्या मदतीने त्याच्या कडा मोकड्या करून घ्या. व थोडे तेल धपाट्यावर टाका.
थोड्या वेळाने धपाट्याचा रंग हलका सोनेरी झाला की, त्याला पालटा व दुसऱ्या बाजूलाही भाजून घ्या.
तुमचे गरमागरम काकडीचे धपाटे तयार आहेत. हे तुम्ही दह्यासोबत वा लोणच्या सोबत सर्व करू शकता.
साहित्य :
कोवळी काकडी – अर्धा किलो
हिरवी मिरची – 2 (काप केलेली)
ओवा – 1 छोटा चमचा
लाल तिखट – 2 छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार)
हळद – 1 छोटा चमचा
जिरे – 1 छोटा चमचा
कांदे – 2 साधारण आकाराचे (बारीक काप केलेले)
बेसन – 2 मोठे चमचे
ज्वारीचे पीठ – 1 मोठा चमचा
तेल – 2 ते 3 मोठे चमचे
मीठ चवीनुसार