साहित्य :
दोन वाट्या गहू, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी सोयाबिन, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी नाचणी, एकमूठ उडदाचे डाळ, एक चहाचा चमचा मेथ्या, गूळ, साजूक तूप आणि स्वादासाठी आठ-दहा वेलदोडे , कांदा, कोथिंबिर, लसूण ( thalipeeth recipe in marathi )
वरील सर्व धान्य वेगवेगळे भाजून घ्यावे. सोयाबिन भाजल्यावर त्याचे टरफल काढून टाकावे. (शेंगदाण्यासारखे त्याचे टरफल निघून जाते) हे सगळे भाजलेले मिश्रण तुपावर बेसन लाडू करताना आपण पीठ भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यावे. सगळी पीठ एकजीव करावे.
कृती :
या पिठात कांदा, कोथिंबिर, लसूण, चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा मिरची पेस्ट घालून खमंग थालीपिठे किंवा धपाटेही करता येतात. हे देखील प्रवासात वापरता येतात.
आजारपणानंतर चव नसते, तेव्हा कमी तेलावर परतवलेली ही थालिपिठे चांगली चव आणतात. हेच पीठ थोडा गूळ आणि तूप घालून दुधात खिरीसारखे शिजवून घेतले तर लहान मुलांना खिमट म्हणून वापरता येते. यामुळे लहान मुलांचे वजनही वाढते आणि त्यांना पौष्टिक अन्नही मिळते. ( thalipeeth recipe in marathi )