साहित्य :
दोन वाट्या कणीक किंवा मैदा, एक चमचा मीठ, ‘एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी तेल, पाणी
कृती :
कणीक किंवा मैदा, मीठ, तिखट, हळद, जिरे, तेल घालून पोळीच्या पिठाप्रमाणे भिजवावे. ‘पोळीप्रमाणे गोळे करून पिठावर लाटून तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावेत. पोळीपेक्षा जाडसर लाटाबेत. लोणचे, मोरंबा, सॉस, चटणीबरोबर खाण्यास द्यावे.