Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

एका ‘क्लिक’वर वाचा, हृदयविकाराचे गंभीर लक्षणे

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2021
in आरोग्य वार्ता, फिटनेस
A A
एका ‘क्लिक’वर वाचा, हृदयविकाराचे गंभीर लक्षणे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. आजकाल 25 ते 30 वर्ष वय असलेल्या हृदयरुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. 2002 मध्ये जागतिक आरोग्यसंघटनेचा हृदयविकार (Heart disease) शी संबंधित अहवाल जाहीर झाला.

त्या अहवावालात असं म्हटलं होतं की, जगातील 12.5 टक्के मृत्यू हे हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने होतात. अमेरिकेतील पाचांतील एक मृत्यू हा हृदयघाताने होत आहे. भारतात 2007 साली 32 टक्के मृत्यू हे हृदयविकारा (Heart disease) मुळे झाले होते. तर यंदा त्याचे प्रमाण 40 टक्क्‌यांपेक्षाही जास्त आहे.

हृदयविकारचे (Heart disease) लक्षणे काय?

– धाप लागते
– श्‍वासोच्छवासाला त्रास होतो
– छातीत धडधडते
– छातीत दुखते
– चक्कर येते
– उलटी, मळमळ
– हातापायांची शक्ती गेल्यासारखे वाटते
– छातीत घट्ट आवळल्यासारखे वाटते
– चालताना धाप लागते. एका दमात चालताना, जिने चढताना धाप, दम लागतो. असे असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये.
– पोटात गॅस झाल्यासारखे वाटते. मात्र, असे झाल्यास घरगुती उपाय करून दुखणे कमी झाले नाही तर तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.
– छातीत आवळल्यासारखे वाटत असेल तर किमान ईसीजी काढून घ्या.
– सारखं सारखं शक्‍ती गेल्यासारखं वाटत असेल तर दुर्लक्ष करू नये.
– रक्तदाब व मधुमेह नेहमी नियंत्रणात ठेवा.

आहारात बदल करून मी हृदयविकार (Heart disease) टाळू शकतो का?

तर या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच मिळेल. आहारात फळे, फळभाज्या, पालेभाज्या, पूर्ण धान्य (मैदा नाही) साखरेचा कमी वापर मीठाचा प्रमाणात वापर. (पदार्थांत मीठ असताना वरून आणखी घ्यायची सवय मोडा) तंतुयुक्त आहार वाढवला, तळकट तेलकट, तूपकट पदार्थ कमी खाल्ले तर हृदयविकार (Heart disease) आपण टाळू शकतो.

रक्तवाहिन्यांत जे चरबीचे थर जमा होतात ते कमी होऊ शकतात व रक्तवाहिन्या रुंद होतात. पूर्वीसारख्या काम करायला लागतात. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयरोग होतो म्हणून एकेकाळी हा कोलेस्टेरॉलचा बागुलबुवा केला गेला. परंतु तसे संशोधनात आढळले नाही.

साजूक तुपालाही आहारातून रामराम केले गेले. परंतु रोज 2/3 चमचे तूप खायला काहीच हरकत नाही. साजूक तूप हा योग्य प्रक्रिया केलेला पदार्थ आहे. त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही.

Tags: aarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहारहृदयविकार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar