Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Rajma Chawal: भारतीय ‘राजमा-चावल’ची जगभर धूम!; टॉप 50 डिशमध्ये दमदार एन्ट्री!

by
April 14, 2026
in लाईफस्टाईल
A A
Rajma Chawal: भारतीय ‘राजमा-चावल’ची जगभर धूम!; टॉप 50 डिशमध्ये दमदार एन्ट्री!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Rajma Chawal: भारतीय खाद्यसंस्कृतीचा सुगंध आता जगभर पोहोचला आहे. आपल्या देशातील पारंपरिक पदार्थ केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठ्या आवडीने खाल्ले जातात. अशाच लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे राजमा-भात. साधा, चविष्ट आणि पोटभर जेवण देणारा हा पदार्थ आता जागतिक स्तरावरही प्रसिद्ध झाला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या एका आंतरराष्ट्रीय यादीत राजमा आणि राजमा-भात यांनी आपली खास जागा निर्माण केली आहे. ही यादी टेस्ट अ‍ॅटलस या प्रसिद्ध फूड प्लॅटफॉर्मने तयार केली आहे. या प्लॅटफॉर्मवर जगभरातील वेगवेगळ्या पदार्थांना लोकांच्या रेटिंगनुसार स्थान दिले जाते.  Rajma Chawal

या यादीत जगातील टॉप 50 ‘बीन डिशेस’ (डाळीपासून बनणारे पदार्थ) समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजमाने टॉप 20 मध्ये स्थान मिळवत 14वा क्रमांक पटकावला आहे. राजमाला सुमारे 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. ही बाब भारतीयांसाठी अभिमानाची आहे. Rajma Chawal

याशिवाय, राजमा-भात या क्लासिक कॉम्बिनेशनलाही या यादीत स्थान मिळाले आहे. राजमा-भातला 3.9 स्टार रेटिंग मिळत 25वा क्रमांक मिळाला आहे. हा पदार्थ भारतातील विशेषतः उत्तर भागात खूप लोकप्रिय आहे. गरमागरम राजमा आणि भात यांचे कॉम्बिनेशन अनेकांसाठी “कंफर्ट फूड” मानले जाते.

या यादीत भारताबरोबरच मेक्सिको, तुर्की, स्पेन, मोरोक्को, जॉर्जिया, रोमानिया आणि हंगेरी यांसारख्या देशांतील पदार्थांचाही समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय पदार्थाने मिळवलेले स्थान अधिक महत्त्वाचे ठरते.

राजमा हा पदार्थ दिसायला साधा असला तरी त्याची चव खूप समृद्ध असते. राजमा बनवताना तो आधी रात्रभर भिजवला जातो. नंतर तो उकळून घेतला जातो. त्यानंतर कढईत तेलात आले-लसूण, कांदा, टोमॅटो प्युरी आणि विविध मसाल्यांसोबत शिजवला जातो. शेवटी तयार होणारी क्रीमी ग्रेव्ही आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे राजमा अधिकच चविष्ट बनतो.

यासोबतच मुंबई शहरानेही खाद्यसंस्कृतीत आपली छाप पाडली आहे. टेस्ट अ‍ॅटलसने जाहीर केलेल्या जगातील टॉप 10 फूड सिटीजच्या यादीत मुंबईला 5वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अमृतसर, नवी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई या भारतीय शहरांचाही या यादीत समावेश आहे.

एकूणच, भारतीय खाद्यसंस्कृतीचा जागतिक स्तरावर वाढत चाललेला प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. राजमा-भातसारखा साधा पदार्थही जगभरात आपली छाप पाडू शकतो, हे या यादीतून स्पष्ट झाले आहे.

 

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar