राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की, राजगिऱ्याच्या लाह्या, राजगिऱ्याची भाकरी, राजगिऱ्याची भाजी आपण नवरात्रात, एकादशी, श्रावणात, उपवासाला खातो. छोट्याश्या दिसण्याऱ्या राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. राजगिऱ्याला सुपर फूड असे म्हंटलं जाते. राजगिऱ्यामध्ये कॅलरीज, कार्बोहैड्रेट, प्रोटीन, आयर्न, फॅट, फायबर, कॅल्शिअम, स्टार्च हे तत्व आहेत. त्याच बरोबर व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी 2, बी 6, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी 3 हे असतात. राजगिरा खाण्याचे फायदे जाणून घेवूया …
राजगिरा खाण्याचे फायदे
1.राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम प्रमाण अधिक असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.
2.राजगिरा ग्लुटेन फ्री आहे. त्यामध्ये फायबर असल्यानं वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
3.राजगिऱ्यात मॅग्नेशियम असते. जर मायग्रेनचा त्रास असेल तर राजगिरा आहारात घ्यावा.
4.राजगिऱ्यात लायसिन मुबलक प्रमाणात असतं. नियमित पणे राजगिऱ्याचा आहारात समावेश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात.
5.राजगिऱ्यामध्ये फायटोस्टरोल असतं जे शरीरामध्ये शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतं व ब्लड प्रेशर कंट्रोल करतं.
6.राजगिऱ्यात झिंक मुबलक प्रमाणात असते जे इम्युन सिस्टिम वाढवण्यात मदत करते.
7.राजगिऱ्यात आयर्न, फायबर, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. गरोदरपणात महिलांनी राजगिरा खावा.
8.लाडू, धिरडी, थालपीठ, डोसे, उपमा करताना यांमध्ये राजगिऱ्याचे पीठ वापरावे.
9.लहान मुलांना चॉकोलेटच्या ऐवजी राजगिऱ्याचा लाडू, चिक्की द्यावी.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.