Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Rajgira: “उपवासापुरता नाही! राजगिरा आहे पोषणाचा खजिना; जाणून घ्या जबरदस्त फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत”

by
July 21, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Rajgira: राजगिरा हा अनेकांच्या घरी उपवासाच्या दिवशी खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. मात्र, केवळ उपवासापुरताच त्याचा वापर मर्यादित ठेवण्याची गरज नाही. आहारतज्ज्ञांच्या मते, राजगिरा हा पोषक तत्त्वांनी भरलेला एक उत्कृष्ट सुपरफूड आहे. त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे तो शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतो. त्यामुळे नियमित आणि योग्य प्रमाणात राजगिर्याचा आहारात समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

राजगिरा नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री असल्यामुळे गहू किंवा ग्लूटेनयुक्त पदार्थ टाळणाऱ्या व्यक्तींसाठी तो उत्तम पर्याय मानला जातो. शिजवलेल्या एका कप राजगिऱ्यात सुमारे ९ ग्रॅम प्रथिने आणि ५ ग्रॅम फायबर असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, राजगिरा मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यातील फायबर आणि इतर पोषक घटकांमुळे शरीरात कार्बोहायड्रेटचे शोषण हळूहळू होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. मात्र, मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्याचे प्रमाण ठरवावे.

पचनक्रिया सुधारण्यास मदत

राजगिर्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास हातभार लागतो. तसेच जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटत असल्याने वारंवार भूक लागत नाही आणि अति खाण्याची सवयही कमी होऊ शकते.

हाडांसाठी पोषणदायी

राजगिऱ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक हाडे मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. नियमित आहारात राजगिऱ्याचा समावेश केल्यास हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. वाढत्या वयात हाडे ठिसूळ होण्याचा धोका कमी करण्यासाठीही तो उपयुक्त मानला जातो.

वजन कमी करण्यासाठी मदत

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही राजगिरा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातील प्रथिने आणि फायबरमुळे पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. मात्र, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्यासोबतच याचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो.

अॅनिमियापासून संरक्षण

राजगिऱ्यात लोहाचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते आणि लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा किंवा अॅनिमियाचा धोका कमी होण्यास हातभार लागू शकतो.

राजगिरा कसा खावा?

राजगिर्याचा वापर अनेक प्रकारे करता येतो. त्याच्या पिठाची भाकरी किंवा पोळी बनवून खाऊ शकता. नेहमीच्या गव्हाच्या पिठात राजगिऱ्याचे पीठ मिसळूनही त्याचा वापर करता येतो. याशिवाय राजगिर्याची लापशी, खीर किंवा दलिया तयार करूनही तो खाता येतो. संपूर्ण दाणे दुधात शिजवून त्यात सुकामेवा घालून पौष्टिक खीर तयार करता येते. उपवासात खाल्ले जाणारे राजगिऱ्याचे लाडू किंवा चिकीही लोकप्रिय आहेत. मात्र, त्यात साखर किंवा गूळ जास्त असल्यास प्रमाणातच खाणे योग्य ठरते.

राजगिरा हा केवळ उपवासाचा पदार्थ नसून रोजच्या संतुलित आहाराचा भाग बनू शकणारे पौष्टिक धान्य आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत त्याचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar