-डॉ मंगेश तिवस्कर
नुकत्याच सुरु झालेल्या पावसाने पाण्यावाटे होणाऱ्या आजारांना बळ दिले आहे. लेप्टोस्पारोसीस, गॅस्ट्रो, हेपिटायटिस तसेच टायफाईड सारखे आजार पावसाळ्यात प्रचंड वाढतात. अतिवृष्टीच्या भागात खालील काळजी घेतल्याने पाण्यातून पसरणाऱ्या आजारापासून तसेच डेंगू आणि मलेरियापासून बचाव होऊ शकतो.
-गढूळ पाणी पिऊ नका. पाणी पिण्याआधी ते पाणी क्लोरीन आणि आयोडीनचा वापर करून स्वच्छ करून घ्या.
-पुराच्या पाण्याने खराब झालेले सगळे खाद्यपदार्थ नष्ट करून टाका.
-पुरामध्ये उत्पन्न होणाऱ्या किड्यांपासून आणि डासांपासून सुरक्षित राहा.
-सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र होत नाही याची काळजी घ्या.
-सांडपाणी जर उघड्यावर वाहात असेल तर प्रशासनाला कळवा आणि रोगप्रसार थांबवा.
-डासांपासून वाचण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला.
-कचराकुंडी उघडी ठेऊ नका आणि कचरा रस्त्यावर टाकू नका.