[[{“value”:”
Quality Tests Failed: ताप आल्यास सेवन केल्या जाणाऱ्या पॅरासिटामोलच्या गोळ्या गुणवत्तेच्या चाचणीत नापास झाल्या आहेत. याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी-3 सप्लिमेंट्स, मधुमेहाच्या गोळ्या आणि उच्च रक्तदाबाच्या औषधांसह 50 हून अधिक औषधे औषध नियामकाने केलेल्या गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे. भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे.
ही औषधे चाचणीत अपयशी –
भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन दर महिन्याला औषध चाचणीसाठी काही औषधे निवडते. त्यानंतर त्यांची तपासणी केली जाते. या वेळी सरकारी संस्थेने व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामॉल आयपी 500 मिलीग्राम, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबावरील औषध टेलमिसार्टन या औषधांची चाचणी केली होती. जे गुणवत्ता चाचणीत नापास झाले.
ही औषधे Hetero Drugs, Alkem Laboratories, Hindustan Antibiotics Limited (HAL), Karnataka Antibiotics and Pharmaceuticals Limited, Meg Lifesciences, Pure and Cure Healthcare यांसारख्या अनेक आघाडीच्या औषध उत्पादक कंपन्यांनी तयार केली आहेत.
पोटाच्या संसर्गासाठी घेतलेले हे औषधही नापास –
PSU हिंदुस्तान अँटिबायोटिक लिमिटेड (HAL) द्वारे उत्पादित पोटाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे औषध मेट्रोनिडाझोल हे गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांपैकी एक आहे.
टोरेंट फार्मास्युटिकल्सने वितरीत केलेल्या आणि उत्तराखंडस्थित प्युअर अँड क्युअर हेल्थकेअरद्वारे उत्पादित केलेल्या व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या देखील चाचणी उत्तीर्ण झाल्या नाहीत. कोलकाता ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी, कोलकाता येथे ॲल्केम हेल्थ सायन्सचे अँटीबायोटिक्स क्लावम 625 आणि पॅन डी बनावट असल्याचे आढळले आहे.
मुलांना दिलेले हे औषधही नापास –
याच प्रयोगशाळेने हैदराबादस्थित Hetero चे Sepodem XP 50 ड्राय सस्पेंशन निकृष्ट दर्जाचे असल्याचे घोषित केले आहे. हे औषध बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या बाबतीत मुलांना दिले जाते. कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या पॅरासिटामॉल गोळ्या देखील गुणवत्तेच्या चिंतेसाठी चिन्हित केल्या आहेत.
The post Quality Tests Failed: पॅरासिटामोलसह दररोजच्या वापरातील हे 53 औषधे गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये फेल, पहा यादी appeared first on Dainik Prabhat.
“}]]