Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pune News : वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी; वाहतूक झाली सुरळीत

by
November 28, 2024
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळणमार्गावरील वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी सकाळी घडली. टँकर उलटल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उलटलेला ठँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

इण्डेन कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून साताऱ्याकडे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाला होता. निघालेला होता. वारजे पुलाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर टँकर उलटला. सुदैवाने समोरून वाहन येत नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. टँकरचालकासह मदतनीस सुखरूप बाहेर पडले.

मात्र, या घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. टँकर आकाराने मोठा असल्याने वाहतूक विस्कळित झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने या भागात कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, टँकरमध्ये गॅस असल्याने बाजूला काढण्यासाठी अडचण आली. सुरक्षेच्या उपाययोजना करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाह्यवळण मार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टँकर बाजूला काढण्यासाठी पाच क्रेन मागविण्यात आल्या. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास टँकर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Join our WhatsApp Channel

The post Pune News : वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी; वाहतूक झाली सुरळीत appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar