[[{“value”:”
पुणे : वानवडीतील भैरोबा नावा परिसरात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मयुर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भैरोबा नाला परिसरात सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे.
गुरुवारी दुपारी टोळके वस्तीत शिरले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. कोयते आणि दांडके उगारुन टोळक्याने दहशत माजविली. या भागातील मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करुन टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ केली.
या घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडले. तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी देऊन टोळके पसार झाले.
पसार होताना टोळक्याने या भागातील कालव्याजवळ लावलेली दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत.
पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे. शहरात वाहनांची तोडफोड आणि दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मतदान संपल्यानंतर वानवडी भागात वाहन तोडफोडीची घटना घडल्याने रहिवासी दहशतीखाली आहेत.
The post Pune News : वानवडीतील भैरोबानाला परिसरात नऊ वाहनांची तोडफाेड; कोयते उगारुन टोळक्याची दहशत appeared first on Dainik Prabhat.
“}]]
