Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

pune news : महिनाभरात ३५ हजार बेशिस्तांवर कारवाई; वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची माहिती

by
November 29, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पुणे – वाहतूक नियम धुडकाविणाऱ्या बेशिस्तांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या ३५ हजारांंहून जास्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. नोव्हेंबरअखेरीपर्यंत ३० हजार ९२७ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या तीन हजार ३४१, तर ६३४ मद्यपि चालकांविरुद्ध कारवाई झाली असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलीस दिवसभरात दोन सत्रांत काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रांत विविध चौकांत वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते. शहरात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाइलवर संभाषण, एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा, तसेच संबंधिताचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या अडीच हजार जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५०० जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे. परवाना किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार असल्याने त्यांना वाहन चालविण्यास बंदी असणार आहे.
– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

– नोव्हेंबरमधील वाहतूक पोलिसांची कारवाई

– एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास : ३३४१

– विरुद्ध दिशेेने वाहन चालविणे : ३०,९२७

– मद्य पिऊन वाहन चालविणे : ६३४

Join our WhatsApp Channel

The post pune news : महिनाभरात ३५ हजार बेशिस्तांवर कारवाई; वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची माहिती appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar