[[{“value”:”
पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे रिंगरोड हा प्रकल्प हाती घेतला असून, तो प्रकल्प डिझाइन बिल्ड फायनान्स ऑपरेट-ट्रान्सफर या तत्त्वावर उभारला जाणार आहे. विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर राज्य शासनाने या रिंगरोडच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटरच्या अंतरातील 117 गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडून काढून एमएसआरडीसीला दिले आहेत. त्यासाठी एमएसआरडीसीला ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून दर्जा देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीकडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून या रस्त्याच्या कामांच्या निविदांना देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने रिंगरोडच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटरच्या परिघात असलेल्या 117 गावांच्या विकासाचा अधिकार ‘एमएसआरडीसी’ला देऊन विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महानगरचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०१५ मध्ये राज्य सरकारकडून पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली. सुमारे सात हजार चौरस किलोमीटर हद्द असलेल्या प्राधिकरणाच्या हद्दीतून हा रिंगरोड जातो. पीएमआरएकडून यापूर्वीच हद्दीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा आराखडा मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. असे असतानाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात अडचणी येणार आहे.
या गावांतील परवानगीचे अधिकार हस्तांतरीत
हवेली : गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वंजाळेवाडी, खाडेवाडी, बहुली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी.
भोर : भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निधन, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डरे, तपरेवाडी, उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी.
पुरंदर : कोडित खुर्द, पुर, पोखर, वारवाडी ,कुंभोशी, सोमुर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, ऑस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे.
मुळशी : मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी, डावजे, माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंढूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले.
वेल्हे : वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे.
The post pune news : पीएमआरडीएचा विकास आराखडा अडचणीत? 117 गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार एमएसआरडीसीला appeared first on Dainik Prabhat.
“}]]