[[{“value”:”
राजगुरूनगर : वाळद (ता. खेड) येथे खास महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 144 महिलांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त आदर्श सरपंच मनोहर पोखरकर यांच्या हस्ते झाले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून मुलींचे समुपदेशन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नीळकंठ कोरडे, मळुदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे, निवृत्त पोलीस अधिकरी सुरेश पोखरकर, पंचायत समितीच्या माजी सदस्या शकुंतला पोखरकर, डॉ. हेमंत सातारकर, डॉ. गायत्री सुपेकर, माता बाल संगोपन केंद्राच्या मनीषा सुर्वे, अस्मिता मोरे, रामदास पोखरकर, राम ढेरंगे,अक्षय भालेराव, संतोष पोखरकर, बबन पोखरकर, बंटी भालेराव, शीला वाळुंज, राजश्री पोखरकर, राजाराम पोखरकर, सारिका गडदे, अशोक कोहिनकर, राणी पोखरकर, दीपिका वाळुंज, मंगेश वायाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वाळद ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, मळुदेवी माध्यमिक विद्यालय व मुंबई माता बाल संगोपन केंद्र, युवा मित्र संघ योजक संस्था, टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.
The post Pune District : वाळदमध्ये 144 महिलांची आरोग्य तपासणी appeared first on Dainik Prabhat.
“}]]