[[{“value”:”
लोणी काळभोर : कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत रहाणा-या नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून नागरिकांवर वैद्यकीय उपचार करण्यास प्राधान्य राहिल, असे प्रतिपादन सरपंच हरेश गोठे यांनी केले.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भिंगरोपन शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे व वर्धापन दिनाचे उद्घाटन हरेश गोठे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच सचिन तुपे, तंटामुक्ती अध्यक्ष बाप्पूसाहेब घुले, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी उपसरपंच भरत निगडे, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे सचिव गोरख घुले, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, सागर निगडे, चंद्रकांत मेमाणे, कैलास तुपे, अजय कुंजीर, लता कुदळे, सारिका भोंगळे, अलका कुंजीर, गोकुळ ताम्हाणे,
उपसरपंच दिपक ताम्हाणे, ग्रामविकास अधिकारी सविता भुजबळ, काळूराम कुंजीर, गजानन जगताप, आदेश जाधव, दिलीप सावंत, विशाल वाईकर, नवनाथ आंबेकर, नाथाशेठ कुंजीर, दादा वाईकर, शाम यादव, प्रफुल्ल कुंजीर, राजेंद्र पेटकर, दत्तात्रय जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराला ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. या शिबिरात 502 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील अनेक नागरिकांची शस्त्रक्रिया होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये मोफत लेन्स बसवून दिले जाणार आहे.
The post Pune District : नागरिकांच्या वैद्यकीय उपचारास प्राधान्य appeared first on Dainik Prabhat.
“}]]