Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pune: हेल्मेट बंधनकारकची अंमलबजावणी सुरू; शासकीय कार्यालयाबाहेर आरटीओकडून तपासणी

by
November 26, 2024
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पुणे – शासकीय कार्यालयात दुचाकीने येणार्‍या कर्मचार्‍यांना हेल्मेट बंधनकारक असल्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. विविध शासकीय कार्यालयाबाहेर आरटीओची पथके तैनात आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कडून कर्मचार्‍यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृतीही केली जात आहे.

न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी शहरातील शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणार्‍या कर्मचार्‍यांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता.

या निर्णयाची अंमलबजावणी आरटीओकडून आजपासून (दि.२५) केली जात आहे. शासकीय कार्यालयांबाहेर हेल्मेट तपासणी केली जात आहे. दरम्यान, तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोन वर्षांपूर्वीच याबाबतचे परिपत्रक काढले होते.

सरकारी कार्यालयात दुचाकीस्वार विनाहेल्मेट आल्यास कारवाई करावी आणि कार्यालयातील अधिकार्‍यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही सवलत देऊ नये, असे यामध्ये म्हटले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर आरटीओकडूनच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

…दुचाकीस्वार नागरिकांवरही कारवाई

सरकारी कार्यालयात विनाहेल्मेट येणार्‍या दुचाकीस्वार कर्मचार्‍यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असून त्यानंतर विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांत वाहनांवरून विना हेम्लेट येणार्‍या इतर नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे.

“विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानूसार शहरातील विविध सरकारी कार्यालयांबाहेर हेल्मेट तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरटीओचे पथके तैनात करण्यात आली आहेत.” – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Join our WhatsApp Channel

The post Pune: हेल्मेट बंधनकारकची अंमलबजावणी सुरू; शासकीय कार्यालयाबाहेर आरटीओकडून तपासणी appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar